चित्ता भारतात परत येतोय
August 12, 2011
जगातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला आणि भारतातून यापूर्वीच नष्ट झालेला चित्ता आता आपल्या देशात परत येण्याची चिन्हे आहेत. नामिबियाहून मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यामध्ये पालपू-कुनो अभयारण्यात चित्ता मागविण्यात येणार आहे. 'सर्व काही योजल्याप्रमाणे झाले तर, येत्या डिसेंबरपर्यंत किंवा पुढच्या वर्षी जानेवारीत चित्ता पालपूर-कुनो वनात प्रवेश करेल', असे मध्य प्रदेशचे वनमंत्री सरताज सिंह यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले.'आपल्या देशातून हा प्राणी नष्ट झाला, म्हणून नामिबियाहून त्याला इथे आणून त्याचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे', असे सिंह म्हणाले.नामिबियातील निसर्ग जतनकर्ते लॉरी मार्कर व वन विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालपूर-कुनो येथे नुकतीच भेट दिली होती. सुमारे ३४४.६८६ चौरस किलोमीटरच्या परिसरात असलेल्या या अभयारण्यात चित्ता परत आणण्यासाठी काय उपाय योजावे लागतील या संबंधी पाहणी यावेळी झाली, असे राज्याच्या वन विभागातील सूत्रांनी सांगितले.पालपूर-कुनोशिवाय मध्य प्रदेशातीलच नौरादेही व राजस्थानमधील शाहगढ येथील अभयारण्यांमध्येही चित्ता आणण्याची योजना आहे. माणसाच्या 'विकासा'च्या वेग एवढा झाला की जमिनीवरच्या या सर्वांत वेगवान प्राण्याला आपले अस्तित्त्व टिकविणे अवघड होऊन बसलेय. या नव्या प्रयत्नांमुळे त्याच्या अस्तित्त्वाला काही नवीन आशा मिळते का पाहू.